अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- दुचाकी चोरणार्या दोन चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पांढरीपुल येथून मुसक्या आवळल्या. सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धननगर, तपोवन रोड, अहमदनगर) व अशोक संजय गिते (रा. केडगाव ता. पाथर्डी) असे पकडलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून चार लाख 80 हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान त्यांचा साथीदार सुधीर कडूबाळ सरकाळे (रा. शहरटाकळी ता. शेवगाव) हा पसार झाला आहे.
गुरूवारी (दि. 13) संतोष भिवा पठारे (वय 34 रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे) यांची दुचाकी बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथून चोरीला गेली होती. याप्रकरणी पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. सदरचा गुन्हा सोमनाथ आव्हाड याने केल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आव्हाड याला अटक केली. यानंतर अशोक गिते याला अटक केली. सुधीर सरकाळे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम