दुष्काळात तेरावा महिना ! बारा गावांचा पाणीप्रश्न ; मिनी भंडारदरा’साठी ग्रामस्थांचे आंदोलन

Published on -

बोधेगाव : शेवगाव तालुक्यात गोळेगाव या ठिकाणी १९७२ च्या दुष्काळात पाझर तलाव (मिनी भंडारदरा) निर्मान करण्यात आला होता.या तलावाची निर्मिती झाल्यापासून ५२ वर्षे उलटून गेली तरीही या तलावाच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. सद्यःस्थितीत दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन तलाव कोरडाठाक पडतो.

त्यामुळे तलावाची दुरुस्ती करून सिमेंटची भिंत बांधावी तसेच उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडावे आणि सुधारित भूजल सर्वेक्षण करावे, ग्रामस्थांच्या या मागणीसाठी गोळेगाव येथील लोकांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे.

या तलावात सिमेंटची भिंत उभारल्यास ‘मिनी भंडारदरा’ प्रकल्प कार्यान्वित होईल.त्यातून काशी नदी परिसरातलया गोळेगावसह नागलवाडी, सेवानगर, लाडजळगाव, आधोडी, दिवटे, शोभानगर, आंतरवाली, चेडेचांदगाव शेकटे, मुरमी, बाडगव्हाण व बालमटाकळी, इत्यादी दहा ते बारा गावांची टँकरपासून मुक्ती होईल.

९ ते १० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. हा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे ग्रामस्थांनी सोमवार (दि. २४) पासून गावातच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात संजय आंधळे, भुजंग आंधळे, नवनाथ फुंदे, बुवासाहेब फुंदे, अमोल वावरे, संदीप फुंदे, शंकर फुंदे, नवनाथ रासनकर, सचिन फुंदे, अजिनाथ आंधळे केशव बर्डे, नवनाथ बर्डे, महादेव बर्डे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

सुधारित भूजल सर्वेक्षणाची मागणी..

भूजल सर्वेक्षण विभागाने गोळेगावचा समावेश सुरक्षित ऐवजी अंशतः शोषितमध्ये केला आहे. त्यामुळे शासनाच्या वैयक्तिक सिंचन विहीर योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. हे सर्वेक्षण चुकीचे असून, संबंधित विभागाने गावाचे प्रत्यक्ष सुधारित सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe