अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, भेर्डापूर, मालुंजा, पढेगाव व भामाठाण या गावातील सन २०२२ मधील अधिवृष्टीपासून वंचित शेतकरी बांधवांना अखेर रखडलेले अनुदान मिळण्याची प्रक्रिया काल शनिवार (ता.३०) पासून सुरू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

रखडलेले अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला.

त्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार वाघ यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत आभार मानले आहे.

शेतकरी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने व उपोषणाचा इशारा दिल्याने शासनाकडून तातडीने दखल घेत रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान लवकरच वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन लाभार्थ्यांची यादी पाहून कागदपत्राची पूर्तता करून केवायसी करावी.

यात काही अडचण आल्यास शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कदम यांच्याकडे किंवा आपआपल्या गावच्या सरपंचांकडे संपर्क करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe