‘ही’ मुलगी होणार माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची सून ! पहिल्यांदाच होतंय असे काही…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्याकडून राजकीय सोयऱ्या- धायऱ्यांच्या(सोधा) परंपरेला ब्रेक देण्यात आला आहे. त्यांचा मुलगा अक्षय यांच्यासाठी कर्डीले यांनी बिगर राजकीय सोयरीक केली आहे.

कापूरवाडी येथील फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातील मुलगी कर्डीले यांची सून होणार आहे. १ डिसेंबर रोजी अक्षय कर्डिले व प्रियांका कासार यांचा साखरपुडा नगर येथे बंधन लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.

बुर्हाणनगर जवळच असलेल्या कापूरवाडी येथील कासार परिवाराला राजकीय पार्श्वभूमी नाही. याआधी कर्डिले परिवार मुलींच्या विवाहानिमित्त जगताप व कोतकर या राजकारणात सक्रिय असलेल्या परिवाराशी जोडले गेलेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe