Ahmednagar News : हे सरकार कोणालाही आरक्षण देणार नाही, ना मराठा समाजाला, ना धनगर समाजाला, हे खोके सरकार नागरिकांना झुलवत ठेवणारे सरकार आहे, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी केली. मिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ‘होऊन जाऊदे चर्चा’ या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी बोलत होते.
पुढे बोलताना दळवी म्हणाले की, मनोज जरांगे शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. मात्र, या सरकारने हुकुमशाही पद्धतीने लाठी चार्ज करून नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. आंदोलन चिघळल्याने हे खडबडून जागे झाले. मात्र, यांनी आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही.

खोटे आश्वासन देऊन हे वेळ काढून करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले. मात्र, अनेक नियम लावले. आज शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत, अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, सध्याचे सरकार हे फसवे व शेतकरीविरोधी सरकार आहे.
तालुकाप्रमुख भगवानराव दराडे म्हणाले, सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव तर सोडा कांदा टोमॅटोचे भाव थोडे वाढले तरी यांनी ते इतर देशाकडून आयात करून देशातील शेतकऱ्यांना खड्डयात घातले.
हे शेतकऱ्यांसाठी कोणतीही कर्जमाफी करणार नाही. मात्र, शेतीमालाला कवडी मोलाने विक्री करायला लावणारे हे सरकार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय कोरडे यांनी केले तर आदिनाथ शेळके यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, मा. जि.प. सदस्या उषाताई कराळे, उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, केशव रामकिसन भिसे, अंकुश आव्हाड, भाऊसाहेब धस, भागीनाथ गवळी, दत्तात्रय कोरडे, उद्धव दुसंग, भारत घोडके,
सुरेश बर्फे, दिलीप शिदोरे, संभाजी दारकुंडे, बबन खेडकर, विनायक देशमुख, भाऊसाहेब निमसे, किशोर गाडेकर, कारभारी गवळी, काणिफ जगताप, फुलचंद चेमटे, महादेव शिरसाट, बाळासाहेब केंदळे, विठ्ठल शिदोरे, बाळासाहेब घुले, निशिकांत पुंड, शरद गवळी, आदिनाथ शेळके आदी उपस्थित होते.