भाजप सरकारमुळेच महावितरणची ‘ही’दुर्दशा राज्यमंत्री ना. तनपुरे यांचा आरोप

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-   भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी हे अनुदान न दिल्यामुळे आज महावितरणची ही दुर्दशा झाली आहे.(Prajakt Tanpure)

त्यावेळी थकबाकी जवळपास ३० हजार कोटींच्या घरात होती. भाजप सरकारने वितरण कंपनीला अनुदान दिले असते तर, आता ७० हजार कोटी रुपायाच्या घरात गेली नसती.

या थकबाकीला भाजप सरकार जबाबदार आहे. याचा भुर्दड आता शेतकर्‍यांना भरण्याची वेळ आली आहे, अशी टीका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

नगर तालुक्यात एका कार्यक्रमात राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नगर तालुक्यात सुडाचे राजकारण चालते. लोकांना निवडणुकीत पडून देखील अजून समज आली नाही.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील कोणत्याही दबावाला बळी पडू नये.

मात्र, अशा लोकांच्या वागण्यावरून त्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली यावरून हे दिसून येते असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे नाव न घेत तनपुरे यांनी लावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe