अहिल्यानगर : अगोदरच एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र काही काळाने त्याला जमीन मिळाला अन तो जेलमधून बाहेर पडला. परंतु बाहेर पडताच परत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करत असतानाच पोलिसांनी अटक केली आहे.
त्यामुळे आता त्याची आगीतून निघाला अन फुपाट्यात पडला अशी अवस्था झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमी दाराकडुन माहीती मिळाली की, शहरात शेवगाव रस्त्यावर काही युवक गावठी कट्टा दाखवुन दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत.

अशी माहीती मिळताच त्यांनी पथकास घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणारा रोहीत गोरख बेळगे (वय २३ वर्षे) रा. वाळुंज ता. पाथर्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांनी रोहीत गोरक्ष बेळगे याला ताब्यात घेतले. त्याच्या खिशात दोन जिवंत काडतुस सापडले.
मात्र गावठी कट्टा मिळून आला नाही त्यामुळे त्याच्याकडे कसुन चौकशी केल्यानंतर त्याने बाजार समितीच्या आवाराच गावठी कट्टा टाकुन दिला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याने दाखवलेल्या भागातुन फेकुन दिलेला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त केले आहेत.
दरम्यान रोहीत बेळगे याचा आणखी एक साथीदार पळुन गेला आहे. बेळगे याची अधिक माहिती घेतली असता त्याच्यावर यापुर्वीही खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल असुन त्यात तो जामीनावर सुटलेला आहे. अशी माहिती समोर आली आहे.