‘या’ पालिका प्रशासनाने उचलला अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचा विडा: आजपासून दुसऱ्या टप्यातील कारवाई सुरू

Sushant Kulkarni
Updated:

Ahilyanagar News: महसूल पोलीस व पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोमवार पासून सुरू झाली. पोलिसांचा मोठा फौज फाटा यासाठी तैनात करण्यात आला आहे. बाजारपेठेसह वाहतुकीला अडथळा ठरणारी व पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत.

गरीबांचे गाडे हटविण्याआधी श्रीमंताच्या हवेल्या पाडा असा सुर शहरातील नागरीकामधुन उमटत होता. आता अतिक्रमण जमीनदोस्त करणार असा विडाच पाथर्डी पालिका प्रशासनाने उचलला आहे. गेल्या आठवड्यापासून स्थानिक प्रशासनाने महामार्गासह राजमार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम हाती घेतली असून आता मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. पालिका प्रशासनाने अजंठा चौक ते क्रांती चौकादरम्यान गटारीवरील ओटे, दुकानापुढील सरकारी जागेतील पायऱ्या, रस्त्यावर मांडलेले पलंग, उर्दू शाळा परिसरातील मटण विक्री केंद्र अशा भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

पालिकेचे पथक दररोज फिरत असले तरी दुपारनंतर काही मोक्याच्या ठिकाणी फेरीवाले पुन्हा बसतात. काही भागातील विस्थापित झालेल्या काही व्यवसायिकांनी पालिका पथकाकडे तक्रार करत गोरगरिबांचे संसार संपवले, धन दांडग्यांचे यांचे काय, जेवढी जागा तेवढीच ओटे बांधून काही दुकाने पुढे आली. नवी पेठेत राजकीय नेत्याची टपरी दिमाखात उभी असून मेन रोडवर पलंग आहेत.

अर्धा रस्ता व्यापून दुकानाबाहेर सामान लटकवले जाते. भाजी बाजारात तर काहींना आशीर्वाद तर काही विक्रेत्यांना मातीवर बसायला भाग पाडले. न्यायालयाचा निकाल असूनही मोठ्यांची दुकाने दिमाखात उभी आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल केला. चिंचपूर रस्त्यावर दुकानाचे सामान रस्त्यावर मांडून एक बाजू बंद झाली असूनही डोळे झाक होत असेल तर उन्हा पावसात बसून धंदा करणाऱ्यांच्या पोटावर पाय देऊन तुम्हाला कोण शाबासकी देणार आहे, याबाबत स्पष्टीकरण मागितले असता पालिका पथक निरउत्तर झाले.

एका बाजूने शहरात सर्वत्र वाजत गाजत अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने भर चौकात जुन्या बस स्थानकात अतिक्रमण होऊन काही भाडेकरूने वाढीव जागा लाटून तेथे दारू विक्री व अन्य अवैध धंदे चालवले आहेत. यापूर्वी तेथे स्थानिक पोलिसांनी छापा घालून धंदा बंद केला, तो पुन्हा सुरू झाला आहे. एसटी सह पोलीस व पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

जिल्हा बँकेने प्रवेशद्वाराची उंची व रुंदी वाढवण्याचा निर्णय अजूनही अमलात आणलेला नसल्याने तेथे वाहने पार्किंग होऊन वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. याबाबत पालिका अतिक्रमण विभाग प्रमुख दत्तात्रय ढवळे यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले, सोमवार व मंगळवारी मेन रोड, नवी पेठ, शेवगाव रस्ता अशा भागातील पक्की अतिक्रमणे हटवण्याबाबत मुख्याधिकारी यांनी पालिका प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे विनंती पत्र पालिकेने महसूल व पोलीस प्रशासनाला सुद्धा दिली आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून बळाचा वापर करण्यापूर्वीच आपले साहित्य हटवून जागा मोकळी करावी असे आवाहन करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe