Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ बालमटाकळी शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालमटाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित बंद केलेला रस्ता प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुन्हा खूला करण्यात आला.शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच अमर गरड, भारत गरड, विष्णुदास रामावत यांनी चर खोदुन रस्ता हा बंद केल्याने वस्तीवर तसेच शेतामध्ये जाता येत नव्हते.
हा बंद केलेला रस्ता खुला करण्यासाठी पीडित शेतकरी श्रीकिसन काकडेसह वस्तीवरील नऊ शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना रस्ता खुला करून न्याय मिळवून देण्यासंदर्भात लेखी निवेदनातून शेवगाव तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह तसेच गुराढोरासह आमरण उपोषणाचा इशारा देताच दोन दिवसातच शेवगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी महसूल सहाय्यक अंधारे भाऊसाहेब यांना रस्त्याची पाहणी करून रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्याने महसूल सहायक अंधारे भाऊसाहेब यांनी स्वतः घटना स्थळाची पाहणी केली आणि पंचनामा करून हातात खोरे घेऊन रस्ता खुला करून दिला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/16-1.jpg)
तसेच हा रस्ता वडिलोपार्जित असून रस्ता खुला करताना कोणी शेतकरी आडवे आल्यास त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने सदर रस्ता हा खुला करण्यात आला असून शासनाने काकडे वस्ती येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
यावेळी शेकटे बुद्रुक येथील ग्रामसेवक रामेश्वर जाधव, भाऊसाहेब महाराज गरड, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र फाटे, जगन्नाथ महाराज गरड, मोहनराव रसाळ, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, कोतवाल रामजी भोंगळे, भोलेनाथ गरड, पांडुरंग कोरडे, उत्तम गरड, दुर्गाजी रसाळ, विठ्ठल पंडित काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यात ज्या या ठिकाणी रस्ते संदर्भात अडचणी आहेत, त्या ठिकाणी आम्ही तात्काळ सुनावणी घेऊन नियमानुसार आदेश पारित करून रस्त्याचे प्रश्न निकाली काढत असून रस्ते अडविणाऱ्यावर कलम १८८ नुसार महसूल प्रशासनामार्फत फौजदारी कारवाई करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी देखील विनाकारण शेत रस्ते अडवू नये. – प्रशांत सांगडे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, शेवगाव
एकीकडे सरकार शिवपाणंद रस्ते व शिवरस्ते खुले करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून अभियान राबवत आहे.दुसरीकडे शेतकरीच एकमेकांची जिरवण्यासाठी चालू असलेले रस्ते अडवत आहेत.पण आज शेवगाव येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी रस्ता खुला करण्यासाठी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या कामाचा आदर्श सर्वच राज्यातील तहसिलदारांनी घेतला तर राज्यातील पन्नास टक्केच्या पुढे शेत रस्त्यांच्या तक्रारी कमी होतील.यामधून विनाकारण प्रशासनाचा होत असलेला खर्च आणि वेळ देखील वाचेल – मधुकर पाटेकर, सामाजिक कार्यकर्ते, बालमटाकळी
१५ फेब्रुवारी २०२५ बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालमटाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित बंद केलेला रस्ता प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुन्हा खूला करण्यात आला.शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच अमर गरड, भारत गरड, विष्णुदास रामावत यांनी चर खोदुन रस्ता हा बंद केल्याने वस्तीवर तसेच शेतामध्ये जाता येत नव्हते.
हा बंद केलेला रस्ता खुला करण्यासाठी पीडित शेतकरी श्रीकिसन काकडेसह वस्तीवरील नऊ शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना रस्ता खुला करून न्याय मिळवून देण्यासंदर्भात लेखी निवेदनातून शेवगाव तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह तसेच गुराढोरासह आमरण उपोषणाचा इशारा देताच दोन दिवसातच शेवगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी महसूल सहाय्यक अंधारे भाऊसाहेब यांना रस्त्याची पाहणी करून रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्याने महसूल सहायक अंधारे भाऊसाहेब यांनी स्वतः घटना स्थळाची पाहणी केली आणि पंचनामा करून हातात खोरे घेऊन रस्ता खुला करून दिला.
तसेच हा रस्ता वडिलोपार्जित असून रस्ता खुला करताना कोणी शेतकरी आडवे आल्यास त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने सदर रस्ता हा खुला करण्यात आला असून शासनाने काकडे वस्ती येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
यावेळी शेकटे बुद्रुक येथील ग्रामसेवक रामेश्वर जाधव, भाऊसाहेब महाराज गरड, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र फाटे, जगन्नाथ महाराज गरड, मोहनराव रसाळ, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, कोतवाल रामजी भोंगळे, भोलेनाथ गरड, पांडुरंग कोरडे, उत्तम गरड, दुर्गाजी रसाळ, विठ्ठल पंडित काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यात ज्या या ठिकाणी रस्ते संदर्भात अडचणी आहेत, त्या ठिकाणी आम्ही तात्काळ सुनावणी घेऊन नियमानुसार आदेश पारित करून रस्त्याचे प्रश्न निकाली काढत असून रस्ते अडविणाऱ्यावर कलम १८८ नुसार महसूल प्रशासनामार्फत फौजदारी कारवाई करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी देखील विनाकारण शेत रस्ते अडवू नये. – प्रशांत सांगडे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, शेवगाव
एकीकडे सरकार शिवपाणंद रस्ते व शिवरस्ते खुले करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून अभियान राबवत आहे.दुसरीकडे शेतकरीच एकमेकांची जिरवण्यासाठी चालू असलेले रस्ते अडवत आहेत.पण आज शेवगाव येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी रस्ता खुला करण्यासाठी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या कामाचा आदर्श सर्वच राज्यातील तहसिलदारांनी घेतला तर राज्यातील पन्नास टक्केच्या पुढे शेत रस्त्यांच्या तक्रारी कमी होतील.यामधून विनाकारण प्रशासनाचा होत असलेला खर्च आणि वेळ देखील वाचेल – मधुकर पाटेकर, सामाजिक कार्यकर्ते, बालमटाकळी
१५ फेब्रुवारी २०२५ बालमटाकळी शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालमटाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित बंद केलेला रस्ता प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुन्हा खूला करण्यात आला.शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच अमर गरड, भारत गरड, विष्णुदास रामावत यांनी चर खोदुन रस्ता हा बंद केल्याने वस्तीवर तसेच शेतामध्ये जाता येत नव्हते.