अहिल्यानगर : यंदा शनिमावस्याची पर्वणी ७५ वर्षातून आल्याने व देवस्थान समितीने उटणे विधी कार्यक्रमासाठी वाढल्याने भाविकांची गर्दी वाढून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येईल असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे.
मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी उत्सवासाठी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यासाठी विविध गावांच्या भाविकांसह मंडळांनी सढळ हाताने देऊ केलेले दान चर्चेचा विषय ठरला आहे.

आजपर्यंत एवढा भव्य प्रमाणात भाविकांचा सहभाग नव्हता. मायंबा येथे भाविकांना महाप्रसाद स्वरूपात बुंदी लाडू लापशी, सांबर, भात ,चहापाणी ,पाऊच व जार अशा साहित्याची दान अनेकांनी केले आहे. यामध्ये एक लाख पॅकेट पाणी पाऊच दोन हजार जार पाणी पाचशे टन गुळ , पाचशे टन भरडा ,
एक टँकर तेल, एक टँकर दूध , तीस टन दाळ ,दोन टन रवा ,दोन टन पोहे ,५०० क्विंटल शेव , तिन लाख कागदी ग्लास दोन टन भाजीपाला, एक टन शेंगदाणे, पाच टन साखर , पाच क्विंटल चहा पावडर ,आदी स्वरूपाचे साहित्य रात्री उशिरापर्यंत येऊन काही गावचे भाविक मंडळी बुंदी व लाडू तयार करून आणणार आहेत .
बहुतेक भाविक माल तयार करून तर परिसरातील भाविक मंदिर परिसरात स्टॉल लावून महाप्रसाद वितरीत करतात . भाविकांच्या अंगावर अंतर्वस्त्र शिवाय कोणतीच वस्त्र घातले जात नसल्याने दर्शन रांगेसह सर्वच भाविकांना त मायंबा परिसरातील वास्तव्या दरम्यान महाप्रसाद जलपान व अन्य सुविधा नाथांची सेवा म्हणून भाविकांकडून केली जाते.
वर्षातील एकच दिवस नाथांच्या समाधीला हस्त स्पर्श होत असल्याने भाविकांची गर्दी उसळते.कावडीचे पाणी पडण्यास प्रारंभ झाल्यापासून पाडव्याच्या पहाटे महापूजा होईपर्यंत मंदिर व परिसरात महिलांना प्रवेश वर्ज्य असतो अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्षांनी दिली.