सध्या एक खळबळ उडवून देणारे वृत्त आले आहे. महाराष्ट्रातील एका गावात दहशतवादी तळ निर्माणहोणार होता..येथे दहशतवादी एकत्र येऊ लागले होते..भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी व घातपाती कारवाया करुन अराजकता निर्माण करण्यासाठी प्लॅनिंग सुरु होत..धक्कादायक म्हणजे अतिरेक्यांनी या गावाला परस्पर “स्वतंत्र” जाहीर करून या गावास “अल् शाम” असं नाव ठेवले..
ISIS च्या सिरीयाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी काम सुरु झालं होत अशी भयंकर बातमी सध्या समोर आली आहे. हे गाव आहे ठाणे जिल्ह्यातील पडघा गाव. या गावामध्ये देशभरातून जिहादी युवकांना एकत्र आणायचं आणि त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण द्यायचं असं घातक नियोजन असल्याचं NIA च्या तपासातून समोर आलं आहे. या तपासामुळे इसिसच्या टेरर मॉड्यूलचा भांडाफोड झाला आहे.
महाराष्ट्रभर ड्रोन हल्ले करण्याचे होते नियोजन?
राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकाच वेळी छापे मारले. त्या छाप्यात अतिरेक्यांचा भयंकर कट उघड झाला. भिवंडीमधील पडघा गावामधून १५ जणांना अटक करण्यात आली असून पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकाच वेळी छापे मारले गेले आहेत. यामध्ये घाटकोपर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साकिब नाचण हा देखील आहे. विशेष म्हणजे त्याचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांनाही या छापेमारीत अटक केली आहे.
धक्कादायक माहिती अशी की, अतिरेक्यांनी मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी जाऊन रेकी केली होतीच पण त्यांनी गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची योजना आखली होती. या लोकांना विदेशातून पैसा मिळत असल्याचेच समोर आले आहे. येथे सहभागी होणाऱ्या दहशतवाद्यांना साकिब नाचन हा ‘बायथ’ म्हणजे आयएसआयएससाठी निष्ठा ठेवण्याची शपथ द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.