सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा; सहकार आयुक्तांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वपूर्ण माहिती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  ग्रामीण अर्थकारणात सहकारातून समृध्दी निर्माण करण्याचे काम सेवा सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहेत. सेवा सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत.

शेतकर्‍यांना पेरणी ते उत्पादन आणि मालाची साठवणूकीसाठी सेवा सोसायट्यांनी दर्जेदार वस्तू व सेवा पुरवठा केल्यास ग्रामीण अर्थ कारणास बळकटी मिळेल, असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.

यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सेवा सोसायट्यांना तीन टक्क्यांनी दोन कोटी रूपयांपर्यंत पतपुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयुक्त कवडे यांनी नाशिक विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतली.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर उपस्थित होते. आयुक्त कवडे म्हणाले, अलिकडच्या काळात जिल्हा बँकांची राष्ट्रीयकृत व खासगी बँकांशी स्पर्धा वाढली आहे.

राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. त्यांना योग्य कर्जपुरवठा होत नसल्याचे लक्षात आले आहे. यामुळे सेवा सोसायटीचे खातेदार राष्ट्रीकृत बँकाकडे जात आहे.

त्यांना पुन्हा सेवा सोसायटीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हा बँकांनी पाऊले उचलली आहेत. ज्या खातेदारांना सेवा सोसायटी कर्ज देऊ शकत नाही अशा खातेदारांना जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा करण्याचा विचार जिल्हा बँका करत आहेत.

सोलापूर जिल्हा बँकांनी तो प्रयोग राबविला असून राज्यातील इतर जिल्हा बँकांना तसे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा सोसायटींनी फक्त कर्ज पुरवठा करावा येवढेच काम अपेक्षीत नाही.

त्यांनी शेतकर्‍यांसाठी पेरणीपासून उत्पादन व पुढे विक्रीपर्यंत काम करणे अपेक्षित आहे. सेवा सोसायटीने गावामध्ये शेतकर्‍यांसाठी किफायतशीर दरामध्ये दर्जदार अशा वस्तू व सेवा द्याव्यात यामुळे गावचे अर्थकारण बळकटीसाठी मदत होईल.

तसेच उत्पादन खर्च कमी होऊन शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा आहे. यासाठी सेवा सोसायट्यांनी काम करणे आवश्यक आहे.

यासाठी सेवा सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राने यासाठी दोन योजना आणल्या आहेत. दोन कोटीपर्यंचे कर्ज तीन टक्के व्याजाने दिले देण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती आयुक्त कवडे यांनी दिली.

वन टाइम सेंटलमेंट’ चा विचार सेवा सोसायटीकडून शेतकर्‍यांना कर्जपुरवठा केल्यानंतर तो वसूल करण्याचे काम सेवा सोसायटीचे आहे. परंतू अनेक सेवा सोसायटींकडे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे.

वसूलीबाबत जिल्हा बँकांनी सोसायट्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. वर्षांनूवर्ष थकीत असलेल्या कर्जदारांसाठी ‘वन टाइम सेंटलमेंट’ सारखी योजना आणण्याचा विचार सध्या सुरू आहे. यासाठी एक समिती नियुक्त केली असल्याची माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe