अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
त्यानुसार जिल्ह्यात आजपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.

या वर्गाना अध्यापन करणाऱ्या कर्जत तालुक्यातील ७०६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६२ शिक्षकांची कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. याशिवाय काही शिक्षकांनी स्वेच्छेने इतर ठिकाणी चाचण्या केल्या आहेत.
मात्र ज्या शिक्षकांनी कोरोना चाचणी झाली नाही तसेच अहवाल प्राप्त झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शाळेत हजर होवू नये अशी माहिती कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













