ज्यांनी आधी नवे ठेवली आता तेच लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत – कर्डीले !

Ahmednagarlive24 office
Published:
kardile

राज्यातील गोरगरीब, गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील गोरगरीब गरजू पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.

अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेला राज्यभरातून सर्व महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेला आधी नावे ठेवणारे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आता या योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. अशी टीका जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

कर्डीले राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे या योजनेचे अर्ज भरून घेण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पच्या शुभारंभप्रसंगी कर्डिले बोलत होते. कर्डिले म्हणाले सुरुवातीला महाआघाडीच्या नेत्यांनी तसेच स्थानिक आमदारांनी या योजनेवर टीका केली.

महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या योजनेत अधिक लक्ष घालून या योजनेतील क्लिष्टता दूर केली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही अतिशय मेहनत घेऊन घरोघरी ही योजना पोचवली.

याचाच परिणाम म्हणून सर्व गाव खेड्यांनी तसेच शहरातसुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. महिला भगिनींनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपले फॉर्म व्यवस्थित भरून अंगणवाडी सेविका किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांमार्फत ते ऑनलाईन भरून घ्यावेत जेणेकरून आपल्याला अनुदान मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही, असे आवाहन कर्डिले यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म स्वीकृती शिबिरांचे आज बारागाव नांदूरसह राहुरी खुर्द, पिंप्री अवघड व राहुरी शहरातील आझाद चौक येथेही आयोजन करण्यात आले.

यावेळी राहुरी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, नगर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रभाजी सुळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, यमनाजी आघाव, अमोल भनगडे नंदकुमार डोळस, गेनूभाऊ तोडमल, विजय कांबळे, अरुण लांबे, अनिल दौंड, कैलास पवार, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, कुलदीप पवार, समीर पठाण, गणेश खखैरे, शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके, युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, चांगदेव खिलारी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe