अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- युवकाला लोखंडी गज आणि फायटरने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिल्याची घटना पंचपीर चावडी परिसरात घडली.
या मारहाणीत साहिर साबीर शेख (वय 23 रा. आलमगीर, भिंगार) हा युवक जखमी झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहांगिर ऊर्फ रिजवान महेबुब शेख, मुजाहिद ऊर्फ जहीद महेबुब शेख, रफिक सलीम बागवान, समीर सय्यद कालिया (सर्व रा. बागवान गल्ली, पंचपीर चावडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
फिर्यादी शेख हे फायनान्स कंपनीत कामाला असल्याने ते वसूलीकामी पंचपीर चावडी येथे गेले होते. यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले व तू येथे कशाला उभा राहिला, तू निघून जा, असे ते म्हणाले.
शेख यांनी मला फायन्सची वसूल करायची आहे म्हणून थांबलो आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी शेख यांना शिवीगाळ करून लोखंडी गज, फायटरने मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम