Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धक्कदायक वृत्त आले आहे. आई वडीलांना मारण्याची धमकी देत कॉलेज तरूणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आधी अल्वयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले.
त्यानंतर तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणाविरूद्ध अपहरणासह अत्याचाराचा व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून
संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (शुभम राजेंद्र सत्रे, रा. देवळाली प्रवरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, मी बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शनिवार दि.२० जानेवारी रोजी सकाळी ११ वा. मी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी होते. तेथे आरोपी शुभम अत्रे आला. त्याने माझे तुझ्यावर प्रेम असून आपण पळून जाऊन लग्न करू असे सांगितले.
त्यानंतर त्याने गुहा येथील का हॉटेलात नेले. तेथे त्याने आई वडीलांना मारून टाकीन, अशी धमकी देवून जबरदस्तीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर अहमदनगर येथे नेले. त्यानंतर आरोपीने चारचाकी वाहनातून अहमदनगर ते बीड रस्त्यावर असलेल्या एका गावात तो घेऊन गेले.
तेथे त्याने एका रूममध्ये ठेवलेले होते. रविवार दि.२१ जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता आरोपीचे चुलत आजाबा आले. त्यांना पाहून आरोपीने त्याठिकाणारून पळ काढला. नंतर त्या आजोबांनी घरी आणून सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.