तरूणाच्या खूनाचा प्रयत्न करणारे तिघे भाऊ जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :-  तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने तरूणावर हल्ला करणारे आरोपी सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

तिघे भाऊ असून त्यांनी सोमवारी रात्री नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) या तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

अनिल गायकवाड हा सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून दिल्लीगेट येथून माळीवाडा येथे जात असताना त्यांना सागर देठे याने नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ थांबविले व त्यांच्या कानाखाली मारली.

अनिल यांनी कानाखाली मारल्याचा जाब विचारला असता राहुल, निलेश, दीपक व त्याची पत्नी हे तेथे आले. त्यांनी अनिल यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

दीपक याने त्याच्याकडील कुर्‍हाडीने अनिल यांच्या हातावर मारली तर सागरने त्याच्याकडील तलवारीने अनिलच्या डोक्यावर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यातील तिघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील दीपक देठे व त्याची पत्नी पसार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe