Ahmednagar News : जमावाकडून तिघांना बेदम मारहाण, अहमदनगरमधील ‘या’ गावात ‘राडा’

Published on -

Ahmednagar News : संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे तिघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे.

या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात दुसऱ्या गटाने मोठी गर्दी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हेवाडी रोड येथील राहुल सोपान गुंजाळ हा तरुण दुचाकीवरून आपल्या दोन मुलींना घेऊन संगमनेरकडे येत होता. सायंकाळी दिल्ली नाका येथील

कोल्हेवाडी रोड येथे आला असता त्याच दरम्यान पिकअप चालकाने दुचाकीला कट मारला. त्यावेळी गुंजाळ हा तरुण कट का मारला ? असे विचारण्यासाठी पिकअप चालकाकडे गेला असता त्यावेळी उलट पिकअप चालकाने गुंजाळ यांना मारहाण केली आहे.

त्यावेळी गुंजाळ यांच्या लहान मुलींनी मोठ्याने आरडाओरड केली. अशा परिस्थितीतही आणखी काहीजण आले आणि त्यांनीही राहुल गुंजाळ (वय ३८), संदीप गुंजाळ (वय ३८) आणि अमोल गुंजाळ (वय ३२) (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) या तिघांना मारहाण केली.

त्यानंतर गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन झालेली घटना सांगितली. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेची माहिती दुसऱ्या जमावाला समजताच त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले होते. तर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड येथील घटनेसंदर्भात पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोर्पीवर कायदेशीर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येईल.

कोणीही शहरात अफ़वा पसरवू नये शांततेचे पालन करावे असे आवाहन सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक संगमनेर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe