चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  नगर-मनमाड महामार्गावर गुहा गावाजवळील गुहापाटाच्या पुढे चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.(Ahmednagar accident news)

गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीहून शिंगणापूरकडे साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेपट्ट्याने चालणारी क्रूजर व नगरहून मनमाडकडेजाणार्‍या कंटेनर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला.

यामध्ये दोन दुचाकीही सापडल्या. क्रुझरमध्ये महिला भाविक प्रवास करत होत्या. अपघात इतका भीषण होता की क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात एक दुचाकीस्वार दोन्हीही गाड्यांमध्ये सापडल्यामुळे त्याने आपला जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरून उडी मारली. त्यामुळे फक्त पायाच्या दुखापतीवर निभावले आहे.

अपघाताची खबर मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, विवेकानंद नर्सिंग होम, इतर ठिकाणी तातडीने हलवण्यात आले.

अंधार झाल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण झाले. अपघातातील जखमींची संपूर्ण माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान या महामार्गाचे सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक चालू होती. कंत्राटदाराने कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाही.

रात्री चालकांसाठी रेडियम पट्टी लावलेल्या नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर चालक पसार झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe