अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- देशभरासह राज्यात सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन या व्हायरसचा बोलबाला झाला असून काही ठिकाणी त्याचे संशयित रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात तीन नागरिक परदेशातून आले आणि प्रशासनाची धांदल उडाली.
मात्र, तिघेही निगेटिव्ह असल्याचे समजताच संबंधित यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. ब्रिटनमधून एक दांपत्य आणि जर्मनीहून एक युवक राहुरी तालुक्यात आल्याचे संबंधित यंत्रणांना वरिष्ठ पातळीवरून कळवण्यात आल्यानंतर प्रशासनाची धांदल उडाली.
सोशल मीडियावर दिवसभर याबाबतच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. मात्र प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळत असल्याचे सर्वांच्या लक्षात येत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटन होऊन एक दांपत्य राहुरीत दाखल झाले. राहुरीत आल्यानंतर ते दांपत्य राजस्थानमध्ये गेले. तेथे कोरोना चाचणी घेतल्यावर निगेटिव्ह आढळून आले.
दरम्यान जर्मनीहून राहुरीत एक युवकही दाखल झाला. त्याने येण्यापूर्वीच कोरोना चाचणी घेऊन निगेटिव्ह आल्याचे संबंधितांना सांगितले. तरीही या युवकाची पुन्हा कोरोना चाचणी घेण्याची सूचना संबंधित विभागाने केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम