Ahmednagar News : राष्ट्रीय वनश्री योजनेमार्फत खा. सुजय विखे पाटील यांनी राबविलेल्या शिबिरांतून जिल्ह्यातील ६० हजार व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी दिली.
शिंदे यांची भाजपाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुणोरे व जवळा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. या वेळी जवळा येथील २० लाख रुपये खर्चाच्या ठाकरवाडी ते बैलगाडा घाट रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे, कामाचे भूमिपूजन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे मा. सभापती काशिनाथ दाते सर, माजी उपसरपंच सागर मैड, दत्ता पवार, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, नवनाथ सालके, बाजीराव अलभर, माजी चेअरमन शिवाजी सालके, सौ. सोनाली सालके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना शिंदे पाटील म्हणाले की, कोव्हिड काळात खा. सुजय विखे पाटील यांनी आपला संपूर्ण निधी लसीकरणासाठी वळवला. देशात राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जिल्ह्यात खा. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जवळपास ६० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.