Ahmednagar News : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

Published on -

Ahmednagar News : एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. निसर्गाचा लहरीपणा,बँकेचे कर्ज, सततची नापिकी यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. आर्थिक दृष्ट्या कोलमडल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली.

सखाराम परमेश्वर काटे (३०) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे शनिवारी दुपारी घडली.

काटे हे शेतकरी आहेत. यांच्याकडे तीन एकर जमीन असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पणतू यंदा पावसाने आखडता घेतलेला हात त्यामुळे उत्पन्न आले नाही. सततची नापिकी आणि डोक्यावर असलेले बँकेचे- कर्ज या मुळे ते आर्थिक संकटात सापडले होते.

त्यामुळे उद्विग्न झालेल्या सखाराम काटे यांनी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्यांना आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले होते.

परंतु डॉक्टरांनी त्यांना तेथे मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात अकरा महिन्यांची एक मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

शेतकऱ्यांची आत्महत्या चिंतेचा विषय

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी जर पाहिली तर ती चिंताजनक आहे.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक संस्था कार्य करत आहेत. सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe