अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कृषी कायद्याविषयी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
याच निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. यावर बोलताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचे मनापासून स्वागत करतो.

देशभरातील शेतकऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. सरकारने हा निर्णय आधीच घेतला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते व त्यांचे हालही झाले नसते.
आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतर त्याचा जल्लोष करायचा ही महाराष्ट्र भाजपची जुनी सवय आहे. त्यामुळे या निर्णयाचा तरी भाजपने जल्लोष करू नये.
अन्यथा ती आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा ठरेल. आगामी पंजाब आणि उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतरही हा निर्णय असाच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
यापुढे कायदे करत असताना सरकारने सर्वसामान्य जनतेला आणि विरोधी पक्षाला विश्वासात घेतल्यास सरकारवर अशी वेळ पुन्हा येणार नाही. असे देखील पवार म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम