‘या’परिसरातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  मागील काही महिन्यांपूर्वी शेवगाव,पाथर्डी तालुक्यात हाहाकार उडाला होता. यात वित्तहानी सोबतच प्राणहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.

आता परत शेवगाव तालुक्यातील अमरापुर परिसरात अवकाळी पावसाने वेचणीस आलेला कापुस पुर्णपणे भिजला तर तुरीच्या फुलाची गळती झाली.

बुधवारी सायंकाळी या परिसरात वीजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चालु वर्षी शेवगाव तालुक्यातील शेतक-यांनी जास्त प्रमाणात तुरीच्या पीकाची पेरणी केलेली आहे.

तुरीच्या पीकाला सध्या भरपुर फुले आलेली असुन थोड्याफार शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे. आज अवकाळी पावसाने शेतक-यांच्या शेतातील उभे असलेले कपाशीच्या झाडावर वेचणीस आलेला कापुस पुर्णपणे भिजला तर तुरीच्या फुलाची गळती झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe