अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ६३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३६ हजार ८७१ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ७२२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५० आणि अँटीजेन चाचणीत ४७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, जामखेड ०३, कर्जत ०२, कोपरगाव १८,
नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर ३६, पाथर्डी ०१, राहुरी ०३, संगमनेर ९०, श्रीगोंदा ०३ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, अकोले ०६, कर्जत १५, कोपरगाव ०१, नगर ग्रा.१२, नेवासा २०,
पारनेर १३, पाथर्डी ०३, राहाता ०६, राहुरी ११, संगमनेर १७, शेवगाव ०९, श्रीरामपूर १४ आणि इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०२, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ०१,
नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी १०, राहुरी ०१, संगमनेर ०८, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ३७, जामखेड २२, कर्जत २४, कोपरगाव ३६, नगर ग्रा. ४२, नेवासा ३५, पारनेर ६७,
पाथर्डी २९, राहाता २२, राहुरी २८, संगमनेर १०८, शेवगाव २५, श्रीगोंदा ७०, श्रीरामपूर ४३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,३६,८७१
उपचार सुरू असलेले रूग्ण:३७२२
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६८७२
एकूण रूग्ण संख्या:३,४७,४६५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम