Ahmednagar News : आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते….

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आरोप- प्रत्यारोपाच्या राजकारणात न पडता निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राला मिळवून द्यायचे, हेच ध्येय आपले होते. यासाठी महायुती सरकार सतेवर यावे लागले.

पाणी आल्याचा आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते, असे भावनिक उद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले.

मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत गोगलगाव लोणी खुर्द गावातील तळ्यांमध्ये आलेल्या निळवंडे पाण्याचे पूजन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढून नागरी सत्कार केला.

याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हाणाले, की लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत आहे. एखादे धरण पूर्ण होणे आणि लाभक्षेत्राला पाणी मिळणे ही खूप मोठी गोष्ट घडली आहे; पण मागील विधानसभेला सांगितले होते की निळवंडे धरणाचे पाणी आले तरच मत मागायला येईल.

अजून विधानसभा निवडणुक लांब आहे; पण राजकीय टीका टिप्पणीत न पडता मागील युती सरकारमध्ये पहील्या २२ किलोमीटर अंतरावरील कालव्यांची कामे सुरू झाली. कालव्यात पाणी येण्यासाठी सुध्दा राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सतेवर यावे लागले, असे विखे पाटील म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या धरणाच्या लोकार्पणासाठी आले. तो आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण ठरला. अजून खूप आपल्याला करायचे आहे. या विषयावरून मोठे राजकारण झाले. केवळ विखे पाटील यांची जाणीवपुर्वक बदनामी केली; परंतु पाणी कालव्यात आल्यानंतर सर्वांना प्रश्नाची उत्तरं मिळाली.

धरणाच्या मुखापाशी काम सुरू नव्हती पण आंदोलन इकडेच सुरू होती. या कामाचे श्रेय कोणाला घ्यायचे त्यांना जरूर घेऊ द्यावे, आपल्याला कोणताही श्रेयवाद करायचा नाही. असे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्यात कुठेही कमी पडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी महानंदाचे चेअरमन राजेश परजणे, बापूसाहेब आहेर, बाळासाहेब आहेर, संजय आहेर, संतोष ब्राम्हणे, कारभारी आहेर, दादासाहेब घोगरे, धनंजय आहेर, संतोष ब्राम्हणे, हरीभाऊ आहेर, शरद आहेर,

मनोज वाघ, बाळासाहेब गोड़ें, सारंगधर दुशिंग, संतोष माघाडे, भाऊसाहेब खाडे, माणिक गोर्डे, योगेश महाराज कांदळकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe