काँग्रेसचे बडे नेते उद्या नगर दौऱ्यावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. याच साखर कारखान्याचा सन 2020 -2021 या गळित हंगामाचा शुभारंभ गुरुवार दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या आयोजित कार्यक्रम निमित्त काँग्रेसचे बडे नेते मंडळी उद्या नगर दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान या कार्यक्रम निमित्त उद्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात

यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राजीव सातव, काँग्रेसचे सचीव वामसी चांद रेड्डी, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाबा उर्फ प्रतापराव ओहोळ यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News