Ahmednagar Breaking : रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधववर अत्याचाराचा गुन्हा

Published on -

Ahmednagar Breaking : रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधव याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

समजलेली अधिक माहिती अशी : सनी जाधव हा रुबाब उद्योग समूहाचा संचालक आहे. याने सदर पीडित महिलेशी आधी जवळीक साधली. याचाच फायदा घेत त्याने तिला कोरेगाव येथील एका हॉटेलवर नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची देखील धमकी दिली असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सनी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना म्हणजे समाजासाठी काळिमा फासणाऱ्या घटना आहेत. अशा घटना अनेकदा घडतां समोर येत आहेत. नुकतेच नगरमधील एका मुलीवर इमामपूर येथील एका लॉजवर नेत अत्याचार झाल्याची घटना ताजी आहे. अशा घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News