अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- शनिवार वाहतूक शाखेने 174 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 37 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना आळा बसावा असा उद्देश आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने कारवाई हाती घेतली आहे. विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान वाहन चालकांनी परिवहन विभागाकडील नियमांनुसार आपले वाहनावर नंबर प्लेट लावूनच वाहन चालवावे, तसेच वाहन अनधिकृत ठिकाणी रस्त्याच्याकडेला पार्क न करता प्रशासनाकडून दिलेल्या
पार्किंगमध्येच पार्किंग करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईल, पैशांच्या बॅग चोरी करणार्या लुटारूंकडून विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहेत.
तसेच शहरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातात वाढ झाली आहे. यामुळे हि कारवाई हाती घेण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम