अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar Weather :– उष्णतेची लाट विदर्भाकडे सरकताना अहमदनगरमध्ये गेल्या बारा वर्षांतील उच्चांकी तापमान नोंदवून गेली. नगरमध्ये आज शुक्रवारी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
गेल्या बारा वर्षांतील एप्रिल महिन्यातील हे उच्चांकी तापमान आहे. नगरमध्ये १० एप्रिल २०१० रोजी तब्बल ४८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.

तो नगरचा आतापर्यंतचा उच्चांक मानला जातो. त्यानंतर १९ एप्रिल २०१७ रोजी ४४. ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. इतर वर्षांत एप्रिलमध्ये ४१ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदले गेले आहे.
नगरमध्ये एप्रिल महिन्याचे सरासरी कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस आहे. उद्यापासून नगरच्या तापमानात किंचित घट होणार आहे. २ व ३ मे रोजी आकाश ढगाळ होऊन तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.