Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकऱ्यांच्या विहीरीतून ५ एचपीच्या दोन पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून यांचा एक साथीदार पसार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले यांच्या मालकीची विहिरीमधील ५ एचपीचीच्या दोन पानबुडी इलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.
याबाबत संजय रंगनाथ उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी पथक तयार करुन तपासाबाबत सुचना दिल्या. दरम्यान इलेक्ट्रीक पानबुडी मोटारी या प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे, कल्याण गुलाब साळवे (सर्व रा. आखतवाडे ता. शेवगाव) यांनी चोरी केल्याबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने आखतवाडे येथे जावुन शिताफीने शोध घेतला असता प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे हे दोघे मिळुन आल्याने त्यांच्याकडुन चोरीला गेलेली पानबुडी मोटर हस्तगत करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि दिगंबर भदाणे, सपोनि सुनिल बागुल, पोहेकॉ प्रशांत नाकाडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकॉ बप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ एकनाथ गर्कळ, पोकों संतोष वाघ, पोकों कृष्णा मोरे यांनी केली