विनयभंग करणार्‍या दोघा भावांना अटक करावी विधवा महिलेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विकास शामसुंदर गायकवाड व आकाश शामसुंदर गायकवाड या आरोपींना अटक करण्याची मागणी पिडीत विधवा महिलेने पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

सदर आरोपींना अटक न झाल्यास गुरुवार दि.28 ऑक्टोबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. नागापूर गावठाण येथे राहणार्‍या विधवा महिलेस विकास श्यामसुंदर गायकवाड व आकाश श्यामसुंदर गायकवाड या बंधूंनी शिवीगाळ करुन

मारहाण केल्याबद्दल एमआयडीसी पोलिस स्टेशनला शुक्रवार दि.8 ऑक्टोबर रोजी सदर गायकवाड बंधूंवर मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी कलम 323, 504, 506 अन्वये सदर महिलेने गुन्हा दाखल केला होता.

मात्र सदर आरोपीने महिलेची छेडछाड करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असताना आरोपींवर कलम 354 प्रमाणे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने, सदर महिलेने आरोपींवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे करुन उपोषणाचा इशारा दिला होता.

याची दखल घेऊन सदर आरोपींवर सोमवार दि.18 ऑक्टोबर रोजी कलम 354 प्रमाणे छेडछाड केल्याप्रकरणी विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच या प्रकरणात आरोपींनी अंतोन गायकवाड याला मारहाण करुन हात फॅक्चर केला. तरी देखील पोलीसांनी आरोपींवर 326 कलम लावला नाही. तसेच आरोपींना अद्यापि अटक करण्यात आली नसल्याचे पिडीत महिलेने निवेदनात म्हंटले आहे.

गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी येथील सन फार्मा चौक येथे विकास गायकवाड याने फिर्यादी महिलेची छेड काढली. हा प्रकार आरोपींच्या घरच्यांना सांगण्यासाठी महिला घरी गेली असता, तेथे असलेल्या विकास व आकाश गायकवाड यांनी तिला शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच गळ्यातील सोन्याच्या मणक्याची पोत तोडून नुकसान केले. हा प्रकार त्यांचा मोठा बंधू अंतोन गायकवाड याला सांगितला.

तो लहान भावांना समजावून सांगण्यासाठी आला असता, दोन्ही भावांनी मोठा भाऊ अंतोन यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद देऊन पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्वरीत आरोपीला अटक करण्याची मागणी पिडीत महिलेने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe