Ahmednagar Breaking : चाकूचा धाकावर दोन विद्यार्थिनींवर अत्याचार, मैत्रिणीकडून घात, आरोपींना केली मदत

Published on -

अहमदनगर जिल्ह्यातून अत्याचारासंदर्भात एक मोठे वृत्त आले आहे. नामांकित महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. यात त्यांच्या मैत्रिणीनेच आरोपींना मदत केल्याचे समोर आले आहे. ही घटना श्रीगोंदे तालुक्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी जिशान कलीम जकाते व सोहेल रियाज जकाते या आरोपीना अटक केली आहे.

यातील त्यांना मदत करणारी अल्पवयीन मुलगी पसार झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुली शहरातील एका महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहत होत्या. पीडिता व तिची दौंड तालुक्यातील मैत्रीण शहरातील एका हॉटेलमध्ये आलेल्या होत्या.

आरोपी जिशान कलीम जकाते त्यावेळी तेथे आला. पीडीतीच्या मैत्रिणीने तिची जकाते सोबत ओळख करून दिली. यावेळी त्या मैत्रिणीच्या आग्रहावरून पीडितेने आरोपी सोबत फोटो काढले. त्याच मध्यस्ती मैत्रिणीने दुसऱ्या पिडीतेची ओळख सोहेल जकाते याच्याशी करून दिली. तिच्यासोबतही आरोपीने एका ठिकाणी बळजबरीने फोटो काढले होते.

पुढे हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेलमध्ये नेत पिडीतांवर दोघांनी अत्याचार केला. हा त्रास असह्य झाल्याने पिडीतांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग हे करतायेत.

ती मुलगी एजंट?

या गुन्ह्यातील आरोपी असणारी ‘ती’ मध्यस्ती करणारी विद्यार्थिनी हिचे विविध लोकांशी संपर्क आहेत. ती नाममात्र शिक्षणासाठी कॉलेजमध्ये येत असून तिचा खरा व्यवसाय एजंटगिरी हा असून अनेक विद्यार्थिनींची तिच्यामुळे फसगत झाली अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!