अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यू झाल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक चिंतेत तसेच भीतीखाली वावरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत पावल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी वनविभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. याच निमित्ताने वनविभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांचा कारभार समोर आला असून,
वन विभागाचे आयुक्त तसेच अधिकारी/पदाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असतानाही ते समोर आले नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.