Ahmednagar News : महापालिकेचे दोनशे कोटी रुपये थकलेत, पण आता थकबाकीदारांनो सावधान ! प्रशसकराज येताच मनपाने उचलले ‘हे’ पाऊल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : महापालिकेचा कर भरणारे अनेक लोक असले तरी काही लोक यातही चुकारपणा करतात. अनेक लोक थकबाकीदार आहेत. आता मनपाने ही करवसुली करण्यासाठी शास्तीमध्ये ७५ टक्के सूट जाहीर केली होती.

परंतु असे असूनही केवळ १० कोटी रुपये वसूल झाले. मनपाचे सध्या दोनशे कोटींची थकबाकी आहे. अनेक लोक ही थकबाकी भरण्यास कुचराई करत आहेत. आता या बड्या थकबाकीदारांची नावे मोठ्या फलकावर शहरातील चौकाचौकात झळकणार असून तसे आदेश आयुक्तांनी वसुली विभागाला दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी अशा कराच्या स्वरूपात मालमत्ताधारकांकडे सुमारे २१० कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मालमत्ताधारकांना ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती.

यामध्ये पहिल्या दहा दिवसांत ६ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा झाला. त्यानंतर उर्वरित २१ दिवसांत ३ कोटी १७ लाख २४ हजार अशी एकूण ९ कोटी ८७ लाख ६४ हजार रुपयांची वसुली झाली.

नवीन नियोजन

कर संकलनासाठी सध्या एका उपायुक्तावर जबाबदारी होती परंतु आता महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रशासकाचा पदभार घेतला व यात बदल केला.

कर संकलनाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी प्रत्येक समितीला एका उपायुक्ताची नियुक्ती केली आहे त्यामुळे आता त्यांच्यावर करसंकलनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

एक लाखांपुढील थकबाकीदार

प्रभाग   थकबाकीदार     थकबाकी

एक     ६६७               २२,७५,१२,०५२
दोन     १०१४              १८,५७,५३,९९७
तीन     २०३                २२,५२,६६,८४१
चार     ८२८                ४५,०६,२५,९०४

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe