कोपरगावच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळयात

Mahesh Waghmare
Published:

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दि. 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार

यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे, (वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर रा. साई हार्मोनी रो हाऊस नं.4, साई सिटी नगर, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याकडे जमा केली होती.

सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तलाठी गणेश सोनवणे व खाजगी इसम करण जगताप करण नारायण जगताप, (वय- 28 वर्ष, रा. यश बंगला, साई विश्व अपार्टमेंट जवळ, साई सिटी परिसर, कोपरगाव, जि.अहिल्यानगर) हे 6500/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार दि.02/01/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.

त्यानुसार दि.02/01/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान खाजगी इसम करण जगताप यांनी तक्रारदार यांच्या सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता तलाठी सोनवणे यांचे करिता ६००० रुपये व स्वतः करिता ५०० रुपये असे एकूण ६५०० /- रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी केली.

दि. 02/01/2025 रोजी साई रेसिडेन्सी अपार्टमेंट, कोपरगाव येथे सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून खाजगी इसम करण नारायण जगताप यांनी पंचा समक्ष ६५०० /- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. तसेच तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे यांनी खाजगी इसम करण नारायण जगताप यांना तक्रारदार यांच्याकडे लाचेची रक्कम मागणी करण्यास प्रोत्साहन दिले व लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली.

दोन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहिल्यानगर. अजित त्रिपुटे पो.हे.कॉ संतोष शिंदे, पो.नि चंद्रकांत काळे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड,पो.हे.कॉ हारून शेख यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe