अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- बाभळेश्वरकडून पिंपरी निर्मळला येताना एका दुचाकीस्वाराने पिंपरी निर्मळ येथील विना मास्क असलेल्या व्यक्तीला अडवत पोलीस असल्याचे सांगुन चार हजारांना गंडवले आहे.
विशेष म्हणजे या भामट्याने दुचाकीस्वाराला नवा कोरा मास्क देखील दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील एका जेष्ठ नागरिक बाभळेश्वरकडून दुचाकीवर विना मास्क घरी येत असताना पिंपरी निर्मळ शिवारात आले असता एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना थांबविले.
आपण मास्क घातलेला नाही. बाभळेश्वर चौकात साहेबांनी आपल्याला विनामास्क पाहिले असून मी पोलीस आहे व साहेब मागुन येत आहेत. तुमच्यावर कडक कारवाई करतील.खिशात काय काय आहे ते बाहेर काढा असा दम भरला.
या व्यक्तीनेही खिशातीला पैसे व सामान बाहेर काढले. खिशातुन काढलेले चार हजार त्याने स्वतःच्या खिशात घातले व आपल्याकडील नवा कोरा मास्क पिंपरी निर्मळ
येथील व्यक्तीला दिला व मास्क लावा व साहेब येण्याच्या आत पटकन निघा असा सल्ला देवुन स्वतःही निघून गेला. मात्र झालेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर आपल्याला फसविण्यात आले असल्याचे समजले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम