कुंभमेळ्याला जाण्यासाठी नगरकरांसाठी दोन रेल्वे

Sushant Kulkarni
Published:

१६ जानेवारी २०२५ नगर : नगरकरांसाठी २६ फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळ्याला जाण्यासाठी २ नवीन रेल्वे चालू केल्या आहेत.पुना ते मऊ गाडी क्र. ०१४५५ दर गुरुवारी दुपारी १२.५५ मिनिटांनी नगर रेल्वे स्थानकावर येणार व प्रयागराजला दुपारी ११,०० वा. पोहोचणार आहे.

तसेच गाडी क्र. ०१४५६ मऊ ते पुना ही गाडी प्रयागराजला रविवारी सकाळी ९.२० वाजता निघणार व सोमवारी ११.२० मिनिटांनी नगर येथे पोहोचणार आहे.दुसरी गाडी २२६८७ म्हैसूर-वाराणसी ही गाडी दर बुधवारी व शुक्रवारी सकाळी ८.१० ला नगर रेल्वे स्थानकावर येणार आहे व प्रयागराजला दुसऱ्या दिवशी ५.३३ ला पोहोचणार आहे.

वाराणसी ते म्हैसूर गाडी २२६८८ ही दर शुक्रवारी व रविवारी रात्री १२.५७ प्रयागराज वरुन निघणार व नगरला दुसऱ्या दिवशी ८.१८ मिनिटानी पोहोचणार असल्याची माहिती भा.ज.प. रेल्वे बोर्डचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी दिली. अधिक माहितीसाठी मो.नं. ९४०५५७०२०६ यावर संपर्क करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe