अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या आईसह मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  भाऊबीजेसाठी माहेरी आलेली आई व आठ वर्षांच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून पडले.

दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील मढी येथे घडली. ओम नवनाथ गादे (वय ८) व वनिता नवनाथ गादे (वय २८, देवीनिमगाव, ता. शेवगाव) असे मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.

दुपारी मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. रात्री उशिरापर्यंत आईचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वनिता भाऊबीजेसाठी वडील नानासाहेब बोरुडे यांच्याकडे आली होती.

बुधवारी सकाळी ती सासरी देवीनिमगाव येथे जाण्यासाठी निघाली. मुलगा ओमला घेऊन ती वडिलांच्या शेतामधील म्हसोबाच्या दर्शनासाठी गेली.

रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत ओम पाय घसरून पडला. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी वनिताने पाण्यात उडी मारली.

त्यात माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती परिसरात कळताच ग्रामस्थ, देवीनिमगाव येथील नातेवाईक घटनास्थळी आले. गळाच्या साह्याने आईचा व मुलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

सायंकाळी चारच्या सुमारास ओमचा मृतदेह सापडला. मिठी मारलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पाणी खोलवर असल्यामुळे आईच्या मृतदेहाचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment