अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- पावसामुळे घराची भिंत कोसळून पडल्याने पाचवीत शिक्षण घेणार्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे गावात घडली आहे.
वैष्णवी सुनील ढोकणे (वय 11) असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पहाटेच्या दरम्यान वीज कडाडली. त्यामुळे ढोकणे कुटुंबातील व्यक्तींना जाग आली.
दरम्यान घराला हादरा बसला. समयसूचकता लक्षात घेता तात्काळ कुटुंबातील अन्य सदस्यांनी घराबाहेर पळ काढला. सुदैवाने कुटुंबातील अन्य व्यक्तींचा जीव वाचला.
मात्र, दुर्दैवाने वैष्णवी ही त्या भिंतीखाली सापडली. वैष्णवीची आजी जखमी झाली. या घटनेचा धसका घेतल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांच्यावर सध्या पुढील उपचार सुरू आहेत.अत्यंत शोकाकुल वातावरणात वैष्णवी हिच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम