अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- एका सात वर्षीय चिमुरड्याचा अत्यंत दुर्दवी घटनेत मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. हुसेन रशिद शेख (वय ७) असे मृत मुलाचे नाव आहे. हि घटना भाजी बाजार तळावर घडली आहे.
याबाबत मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश छबु साळुंके याच्या विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रशिद शफी शेख हे भाजी बाजार तळ परिसरात सुरेश छबु साळुंखे व रशीद शेख शेजारी राहतात. साळुंखे यांच्याकडेे पाळीव कुत्रे आहेत.
त्यातील एक कुत्री व्याली होती. कुत्री तोंडात पिल्लू घेऊन जात असताना सुरेश साळुंखेे यांने त्याच्या हातातील लोखंडी रॉड कुत्रीला फेकून मारला.
काँक्रीट रस्त्यावर रॉड आदळून रशीद शेख यांच्या सात वर्षाच्या मुलगा हुसेन याच्या डोक्यात घुसला. पाथर्डी् येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर हुसेन
याला नगर येथील खाजगी रुग्णालयात हलवले मात्र हुसेनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मयत मुलाचे वडील रशीद शेख यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश साळुंखे याच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम