Maharashtra News:बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सोयी उपलब्ध व्हावे आणि शेतकरी यांची प्रगती व्हावी उत्पन्नाला भाव यावा यासाठी ग्रामीण भागातील एक तरुण 1949 मध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू करून सामाजिक, शैक्षणिक,सहकार, बँकिंग, सिचन क्षेत्रात आपले योगदान दिले असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ प्रमोद येवले यांनी केले.
डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या१२२ व्या जयंती निमित्त प्रा. डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तथा उपाध्यक्ष, भारतीय फार्मसी कौन्सिल,नवी दिल्ली यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-11-at-4.48.21-PM.jpeg)
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त ॲड .श्री. वसंतरावजी कापरे यांनी भूषविले. या समारंभास डॉ विखे पाटील फाऊंडेशनच्या विश्वस्त डॉ. सौ. सुप्रिया विखे-ढोकणे, शैक्षणिक सल्लागार लेफ्टनंट जनरल ( निवृत्त ) डॉ बी.सदानंदा, प्रभारी सचिव तथा तंत्र संचालक प्रा. डॉ.पी.एम. गायकवाड, संस्थेचे वैद्यकीय उपसंचालक प्रा. डॉ.अभिजीत दिवटे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी शिक्षक , विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, आज कालच्या स्पर्धेचे युगात ग्रामीण भागातील तरुणांनी पुढे आले पाहिजे. विद्यार्थी कोणत्या विषयात काय शिकले पाहिजे याची निवड त्यांनी स्वतः केली पाहिजे.
सामाजिक जीवनात वावरताना आपली समाजाचे काहीतरी देणं लागतो त्या करताही काहीतरी विशेष काम करता आले पाहिजे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जीवनगाथा नवतरुणांना विशेषता समाजजीवनात समाजासाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त विविध संस्थेतील गुणवंत विद्यार्थी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले तसेच कोरोना काळात जिल्ह्यातील इतर रुग्णलातील सर्व प्रसूतीचा भार सांभाळणाऱ्या टीमचे आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिली लिव्हर किडनी शस्त्रक्रिया डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये करणारे डॉक्टर्स यांचा सन्मानही या वेळेत करण्यात आला.
तसेच यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग काम करणारे शिक्षकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रम नंतर मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. अभिजीत दिवटे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ प्रताप पवार यांनी केले.