राहूरीत ज्यांनी दगडफेक करून शहर बंद पाडवले त्यांनीच महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याचा विविध संघटनेचा संशय

Published on -

राहुरी : ज्यांनी दगडफेक केली आणि शहर बंद पाडले, त्यांनीच महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली असावी, असा संशय आम्हाला आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी (दि. २६) राहुरी शहरात एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेच्या निषेधासाठी शनिवारी (दि. २९) अनेक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, या घटनेनंतर शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. काही लोकांनी कायदा हातात घेतला. राज्य महामार्गावर रस्ता अडवून टायर जाळले गेले, त्यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली गेली. सामाजिक तणाव वाढवणाऱ्या घोषणा देत दगडफेकही झाली.

या सगळ्यामुळे शहर हादरून गेले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. ज्या समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना केली, त्या प्रकरणाचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचे असताना अद्याप पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत.

हे आरोपी कोणत्याही जाती, धर्म किंवा पंथाचे असोत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा गैरफायदा घेऊन घडलेल्या प्रकारांमुळे सर्वसामान्यांना कायदा खरंच अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

कायदा मोडणारा कोणीही असो, त्याच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी, असे निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष संतोष चोळके, आरपीआयचे प्रवीण लोखंडे, शिरीष गायकवाड, पिंटूनाना साळवे, असलम सय्यद, बाबा साठे, सुभाष पोटे, इसान सय्यद, नौशाद शेख, योगेश पवार, वसीम सय्यद, संदीप कसबे, रियाज इनामदार, आनंद जाधव, समीर पठाण, आसिफ शेख, इरफान शेख, विनायक सावंत, रमेश जाधव, हरिभाऊ पवार, बाबू कुरेशी, रिजवान शेख, प्रकाश जाधव, रविंद्र गायकवाड, नसीर पठाण, मन्सूरखान पठाण यांच्यासह अनेकांनी सह्या केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe