Vidhansabha Election : विधानसभेच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरेंचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर चौथ्यांदा भगवा फडकावला. आता विधानसभेसाठी जोमाने तयारीला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे संगमनेर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे,

जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, लोकसभा समन्वयक जगदीश चौधरी, लोकसभा समन्वयक राजाराम बाणखेले, संगमनेर तालुकाप्रमुख संजय फड, दिलीप साळगट, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, अशोक सातपुते, गुलाब भोसले आदींनी मुंबईत मातोश्री येथे जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेवर दाखवलेला विश्वास, पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम खासदार वाकचौरे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe