विद्याधाम प्राथमिकचे ‘देवाचे घर’ जिल्हास्तरावर प्रथम

Mahesh Waghmare
Published:

देवदैठण :शिरूर येथील विद्याधाम प्राथमिक शाळेने सादर केलेले ‘देवाचे घर ‘ या नाटकाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला . जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे आणि डायट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या होत्या .

यात जिल्हाभरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता विद्याधाम प्राथमिक शाळा शिरूर यांनी सादर केलेल्या देवाचे घर या नाटकाने तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला .

या नाटकात श्रिया कर्णिक ,संस्कृती पठारे, भार्गवी बोरुडे ,भक्ती पवार, रोशनी पिंपरकर ,दिया मोरबाळे, पाटील कोमल, आराध्या जाधव, अभिज्ञा अडसूळ या बालकलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले .

यातील श्रिया कर्णिक, संस्कृती पठारे व भक्ती पवार या विद्यार्थिनींना जिल्हा व तालुकास्तरावर उत्कृष्ट अभिनयासाठी विशेष पारितोषिक देण्यात आले. जिल्हास्तरावर सुप्रसिद्ध अभिनेत्री व बाल रंगभूमी परिषद महाराष्ट्र, अध्यक्ष निलम ताई शिर्के- सामंत यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका जयश्री पाचारणे यांनी या नाटिकेचे दिग्दर्शन केले . सोनाली घेगडे यांनी लेखन व संगीत दिले . साधना कोतकर यांनी वेशभूषा व नैपथ्य याची जबाबदारी सांभाळली .

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा ,सचिव नंदकुमार निकम, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्रजी भटेवरा, मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe