अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय औटी व उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची निवड झाली आहे. आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली.
या निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून पारनेर-श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी तर्फे विजय सदाशिव औटी तर शिवसेने तर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने औटी यांची निवड झाली. दरम्यान पारनेर नगरपंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोचता आले नाही.
मात्र राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना बरोबर घेत बहुमत मिळविले. आज झालेल्या निवडणुकीत सुरेखा भालेकर यांची बहुमताने निवड झाली.
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य निवडून आले होते.
एका अपक्ष सदस्याने मतदानापूर्वी तर एकाने निकालानंतर व दोन शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे आता त्यांची सदस्य संख्या आता 10 झाली आहे. पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 20 डिसेंबर व 19 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्यानंतर 20 जानेवारीस मतमोजणी झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम