अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षे कोव्हीड संकटाला सामोरे जाताना समाज घटक हतबल झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला.
त्यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली असल्याकडे लक्ष वेधून केंद्र सरकार या संकटात प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभे आहे. असे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

प्रवरा सहकारी बँकेची 47 वी अधिमंडळाची सभा चेअरमन अशोकराव म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विखे बोलत होते.
तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन देशातील 42 कोटी लोकांना बँकेशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने शेवटचा माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात येवू शकला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,कोरोना काळात राज्य सरकारची कोणतीही मदत समाजापर्यंत पोहोचू शकली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत कोणती मदत केली याची श्वेतपत्रिका काढण्याची गरज व्यक्त करुन अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यावसायिक, दुकानदारांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम