ऐकलं का? विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराला २४ तास पाणी देऊ…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या वर्षभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या आणि त्याची खात्री नसेल्या अहमदनगर शहराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविले आहे.

‘सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच पुढील वर्षापासून शहराल २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. शहराला २४ तास पाणी आणि वाहतू कोंडीमुक्त रस्ते हे आपले स्वप्न आहे.

ते पूर्ण करून दाखवू,’ असे डॉ. विखे पाटील म्हणाले.आपल्या कारकीर्दीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचे काम सुरू झाले. यासाठी आमदार संग्राम जगताप यांचेही सहकार्य मिळाले. या योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

टाक्या बांधून तयार आहेत. मुख्य जलवाहिनीची कामे झाली आहेत. आता फक्त बेकायदा नळ जोडणी तोडून ही योजना कार्यान्वित करण्याचा अंतिम टप्पा राहिला आहे. यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, त्यांचाही योग्य तो बंदोबस्त केला जाईल. शहरातील लाखो नागरिकांच्या हितासाठी अशा मूठभर लोकांचा वाइटपणा घेण्यास आपण तयार आहोत. मात्र, महापौर बदलल्यानंतर याचे काम ठप्प झाले आहे.

हे काम पूर्ण झाले तरी शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. पाणी वाहून आणण्यासह साठवण क्षमता वाढल्याने २४ तास पाणी पुरवठा करणेही शक्य होईल’, असेही विखे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe