Big Breaking : मराठा आरक्षण मिळेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात पुढाऱ्यांना गावबंदी !

Ahmednagarlive24 office
Published:
Big Breaking

Big Breaking : जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला जाणार नाही, नेते मंडळींच्या डोळेझाकपणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळणे अडचणीचे ठरत आहे,

त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्वरूपाचा फ्लेक्स पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानका जवळील मुख्य चौकात लावण्यात आला असून, हा फ्लेक्स आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आरक्षणाशिवाय गावात नेते मंडळींना प्रवेश बंदी, अशा स्वरूपाचा प्लेस बोर्ड लावणारे मिरी, ता. पाथर्डी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच इतर अनेक समाजाचा आरक्षणाचा लढा सुरू आहे.

या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत असुन, काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी, या गावातही आता सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली असल्याचे या प्लेस बोर्डवरून वर्तवले जात आहे. मराठ्यांना सरसकट ओबीसीतून ५० टक्क्यांआत आरक्षण द्यावे, अशा आशयाचा भलामोठा फ्लेक्स गावात लावण्यात आला आहे.

आरक्षण मिळावे, याकरता महाराष्ट्रातून अनेक गावागावांतून जनजागृती झाल्यामुळे अनेक वेळा राजकीय नेत्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागतेय. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असता ठिकठिकाणी आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनल्यामुळे राजकीय नेत्यांसमोर या प्रश्नातून मार्ग कसा काढावा

आणि गावात जाऊन लोकांना मते कशी मागावी, यासाठी आरक्षण प्रश्नावर काहीतरी योग्य तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा आरक्षण हे आगामी निवडणूकीत राजकीय नेत्यांची डोकेदुखी ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe