Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे एका चिमुरड्याला पळवून नेताना आजूबाजूच्या रहिवाशांनी सतर्कता दाखवत संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
ही घटना ताजी असतानाच गितेवाडी येथे (दि.१२) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शाळेमध्ये घुसून मुलांना आमिष दाखवून पळविण्याच्या प्रयत्नात असलेले संशयित चौघेजण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सतर्क ग्रामस्थांनी या चौघांना बेदम चोप देत पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, गितेवाडीचे सरपंच जनार्धन गिते यांना या भांडे विक्रेत्यांनी आम्ही कुकर व इतर भांडे विकतो, असे सांगून गावात घुसले. गावात एक फेरफटका मारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गाडी थांबवून लहान मुलांना बोलावून त्यांना आमिष दाखविताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले आहेत.
अशातच सरपंच गिते हे चिचोंडीकडे जात असताना त्यांना हे चौघे संशयित शाळेजवळ काय करतात, याचा संशय आल्यानंतर त्यांनी गावातील तरुणांना बोलावून त्यांना शाळेमध्ये पकडून ठेवले, नंतर पाथर्डी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर राज्यव्यापी टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गेल्या वर्षभरात ज्याज्या ठिकाणी मुले पळविण्याच्या प्रयत्न करताना नागरिकांच्या दक्षतेमुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपींशी या टोळीचे संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथेही अशीच घटना घडली होती. मुले पळविणारी टोळी असल्याच्या अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला असता, पोलिस कर्मचारी पोपट आव्हाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन संशयित चौघांना ताब्यात घेतले.
दरम्यान त्या चौघांना पाथर्डी पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांच्या चौकशीत ते परप्रांतीय असून, खेडेगावात कुकर भांडी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती दिली.